Thursday, 20 July 2017

प्रसुती नंतरची काळजीचे सूत्र १

*🌿आयुर्वेद कट्टा🌿..!!*
*गर्भावस्थे नंतरचे " वातआवरण " आणि आयुर्वेद..!!*
" तुझ्याकडे पाहून वाटतंच नाही की तूला मुलं असतील..!!"
हे वाक्य प्रत्येक स्त्री ला हवंस वाटतं पण गर्भावस्थेमधे आणि त्या नंतरही स्त्री शरीरात होणारे बदल पाहून तिच्या बाळांतपणाचा सहज अंदाज लावता येतो..!!
हा अंदाज जर चुकवायचा असेल तर आयुर्वेदाच्या मदतीने नक्कीच फायदा होतो..!!😊
आधी गर्भावस्थेत आणि त्या नंतर शरीरात होणारे बदल कोणतें हे पाहूया..
* अतिरिक्त वजनात वाढ
* चेहऱ्यावर वांग्
* स्तनशैथिल्य
* गर्भाशयमुख बाहेर येणे इ.!!
आता हे बदल फक्त शारीरिक नसून मानसिकही असतात जसे *चिडचिड होणे
* लवकर राग येणे
* असाह्य आणि एकटे वाटणे
या सर्व गोष्टीतून पुढे नैराश्याची भावना निर्माण होऊन suicidal attempts ही होतात..!!
वरील सर्व गोष्टींना कुठे न कुठे विकृत अवस्थेतील वात जबाबदार आहे असं लक्षात येतं..!!
गर्भवती असतांना गर्भपोषणामुळे स्त्री शक्ति कमी झालेली असते त्यात प्रसव वेदना, प्रवाहण , रक्तस्त्राव या सर्वांमुळे क्षीण होते..!!
त्यात 9 महीने पोटात बाळाने व्यापलेली जागा अचानक रिकामी झाल्याने तिथे अतिरिक्त वातसंचय होऊन उदरशैथिल्य निर्माण होते..ज्याला सामान्य भाषेत पोट सुटणे असं म्हंटलं जात..!!
मॉडर्न आस्पेक्ट नुसार याला वजन वाढणे असा समज केला जातो...मग जिम वगेरे लावून अतीव्यायामाने किंवा dieting च्या नावावर रुक्ष पदार्थ खाऊन आणि तेल तूप बंद करून उलट अजून वात वाढलेला दिसतो आणि परिणाम शून्य..!!
अश्या वेळी जर आपण फक्त वजन वाढलं आहे असा विचार न करता शरीर शिथिल झाले आहे असा विचार करून चिकित्सा केली तर जास्त परिणामकारक ठरते..
अर्थात इथे मेदाचा विचार कमी आणि मांस धातू आणि वाताचा विचार जास्त अपेक्षित आहे..!!
uterine prolapse आणि शारीरिक शैथिल्य च्या बाबतीतही जर विशेष काही कारण नसेल तर सुरवातीला स्थाानिक वाताचे शमन केले तरी परिणाम दिसून येतात..!!
चेहऱ्यावर वांग येण्यास मुख्य कारण चिंता आणि क्रोध असे सांगितले आहे..
येथे विकृत दोषांच्या शमना सोबतच रसदुष्टी चा विचार करावा..!!
हे तर झाले व्याधी झाल्यानंतरचे उपक्रम पण आयुर्वेद हा व्याधी होऊच नये यावर विश्वास ठेवतो..
त्यामुळे गर्भावस्थेत असतांना गर्भिणि परिचर्या आणि बाळ झाल्यावर ही स्त्री ला काही त्रास होऊ नये यासाठी आयुर्वेदात सुतीका परिचर्या सांगितली आहे..!!
* योग्य आहार विहार
* रोज वातशामक तेलाने अभ्यंग
अंघोळीच्या वेळी साबणापेक्षा वनस्पति द्रव्यांपासून बनवलेल्या उटण्याचा वापर
* आंघोळीनंतर योनीधूपन
*उदरपट्टबंधन
* पादाभ्यंग इ.
आणि सोबतीला तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली काही वातशमक औषधी योजना केल्या तर हे त्रास होत नाही..!!
गर्भावस्थेमधे आणि त्या नंतरही आयुूर्वेदोक्त परिचर्यांचे पालन केल्यास गर्भाशय पूर्ववत होण्यास मदत होते, बांधा टिकून राहतो,  आणि शारीरिक व मानसिक संतुलन व्यवस्थित राहते त्यामुळे अगदी संतूर च्या जाहिराती सारखी मम्मी नाही पण ती स्त्री एक सुखद मातृत्व प्रवास अनुभवुन स्वस्थ आयुष्य नक्कीच जगू शकते..!!😊
*वैद्य. शुभंदा गुंजाळ चौखंडे*
*अकोला*

No comments:

Post a Comment