Sunday, 25 June 2017

ऋतु, सण व आरोग्य

देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.
गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.
मोदकच का ?
गणेशांना आवडतो म्हणून !
का आवडतो ?
गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी  आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ?  नारळ  आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.

देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.
पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार...... फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ?  हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती.  गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.

नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड,  हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!

वेगवेगळ्या  ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !

Wednesday, 14 June 2017

छोटी समाजसेवा: परिणाम नाही भाव महत्वाचा

*" टिकट कहाँ है ? "*

टी सी ने बर्थ के नीचे छिपी लगभग तेरह - चौदह साल की लडकी से पूछा ।"

टिकिट नहीं है साहब काँपती हुई हाथ जोड़े लडकी बोली,

"तो गाड़ी से उतरो " टीसी ने कहा,

इसका टिकट मैं दे रहीं हूँ,

पीछे से ऊषा भट्टाचार्य की आवाज आई जो पेशे से प्रोफेसर थी ।

"तुम्हें कहाँ जाना है ?" लड़की से पूछा"

पता नहीं मैम !

तब मेरे साथ चल बैंगलोर तक ! ""
तुम्हारा नाम क्या है ?

चित्रा !

"बैंगलोर पहुँच कर ऊषाजी ने चित्रा को अपनी एक पहचान के स्वंयसेवी संस्थान को सौंप दिया । और अच्छे स्कूल में एडमीशन करवा दिया,

जल्द ही ऊषा जी का ट्रांसफर दिल्ली होने की वजह से चित्रा से कभी-कभार फोन पर बात हो जाया करती थी,

करीब बीस साल बाद ऊषाजी को एक लेक्चर के लिए सेन फ्रांसिस्को (अमरीका) बुलाया गया । लेक्चर के बाद जब वह होटल का बिल देने रिसेप्सन पर गई तो पता चला पीछे खड़े एक खूबसूरत दंपत्ति ने बिल भर दिया था,

"तुमने मेरा बिल क्यों भरा ?

*मैम, यह बम्बई से बैंगलोर तक के रेल टिकट के सामने कुछ नहीं है*

""अरे चित्रा ! ! ? ? ? . . . .*

*( चित्रा कोई और नहीं इंफोसिस फाउंडेशन की चेयरमैन सुधा मुर्ति थी, एवं इंफोसिस के संस्थापक श्री नारायण मूर्ति जी की पत्नी थी।)*

यह उन्ही की लिखी पुस्तक "द डे आई स्टाॅप्ड ड्रिंकिंग " से लिया गया कुछ अंश )

देखा आपने!............कभी आपके द्वारा भी की गई *सहायता* किसी की जिन्दगी बदल सकती है।

आप सदा *प्रसन्न* रहें, *निरोग* रहें परमपिता परमेश्वर, हमें जरूरतमन्द की *सहायता करने की समर्थता* प्रदान करें ।।

भेसळ २

भेसळ
काल बायकोने ठाण्याहून खरवस मागवला होता... रात्री टी.वी . पहाता पहाता तो आम्ही चापला.

"कसा मस्त आहे की नाही ?"

हो ....छान आहे.दुधात जिलेटिन घालून केलेला "चिक" व  त्यापासून बनवलेला खरवस मी पहिल्या चमच्यात ओळ्खला होता . पण बायको समोर हो ....छान आहे असे म्हणावे लागले.

आमच्या गोठ्यात ( एके काळी ) वर्षाला ४ /५ म्हशी वीत असत. आणि मग खरवस , नासकोणी , खरवसाची बर्फी असे विविध प्रकार आई / आजी करत असत.

हे खरवस बनवणारे रोज २०० /२५०किलो खरवस बनवतात. तो दादर पर्यन्त अनेक "हाटेलात" पुरवतात.

आता विचार करा , २०० कि. खरवस बनवायला किमान १०० कि. चीक हवा ,त्यासाठी कमीत कमी ५० म्हशी व्यायला पाहिजेत, त्यासाठी किमान ५००० म्हशी गोठ्यात हव्या. असे अनेक खरवस वाले मुंबापुरीत आहेत. मला तरी हे केवळ अशक्य वाट्ते.....एवढ्या म्हशी बाळगण्या परीस तो गोठ्याची जागा विकून बक्कळ पैसा कमवेल.

थोडा विचार +विचारपुस करता " जिलेटिन " + दुध = खरवस हा फॉर्मुला समजला.

बाटली बंद " लोणची " आणि त्यावर तरंगणारे तेल पाहून मला असाच संशय आला. गोडेतेलाची किंमत , लोणच्यामधील तेलाचे प्रमाण व लोणच्याची किंमत ह्याचा मेळ लागेना......

दोन चार ठिकाणी चाचपणी केली . मग उलगडा झाला. " लोणच्या मध्ये वापरले जाणारे तेल गोडेतेल ( शेंगदाणा) नसून सरकीचे (कापुस बी )आसते.

बाजारात लस्सी प्यायची म्हट्ले की मला आठवण होते "सायट्रिक acid " ची . ब्लोटिंग पेपर + सायट्रिक acid= फक्कड लस्सी.

हेच सायट्रिक आसिड दूधाच्या भुकटी बरोबर आले की "छास " तय्यार. ताक प्यायल्यावर जिभेवर कडवट आंबट चव राहिली कि ओळखा ही सायट्रिक आसिड ची कमाल.

हे सायट्रिक आसिड / चुन्या बरोबर " पाणी-पुरी " मध्ये सापड्ते. चुना मिर्ची म्हणून न सायट्रिक आसिड चिंच म्हणून आपण पितो .....भैय्याजी थोडा पानी और.....कारण ही दोनिही रसायने मिर्ची व चिंचे पेक्षा खूप स्वस्त आहेत.

ऊसाचा रस ऊन्हाळ्यात चांगला . पण काही "कलाकार" ह्यामध्ये "सॅकरिन " वापरतात्..... थोड्या रसात भरपूर पाणी +सॅकरिन = भरपूर रस व भरपूर नफा.पण ह्याचा वापर एवढा सर्रास नाही.

टोमॅटो सॉस केवळ "भोपळ्या पासून " बनवतात म्हणुनच हॉटेलातून बाटल्या भर्भरून ठेवलेला असतो व परवडतो .

नेस्ले / एच्.एल्.एल. इ. कंपन्या टोमॅटो सॉस टोमॅटोपासून बनवत असतील ही...

ही थोडी झलक.

शरीरास विशेष हानी कारक भेसळी विषयी परत केंव्हा तरी .

तो पर्यन्त " वडापावाच्या" लसूण चट्णीत " नारळ /खोबरे / शेंगदाणा व समप्रमाणात लाकडाचा भुसा / बारीक केलेला पुठ्ठा नाही ना ? एवढी खात्री करा झाले.
- संकलीत लेख

डॉक्टर व्यथा २

*माझे काय चुकले?*

        मी *डाॅ. समीर रज्जाक तांबोळी.* वैद्यकिय अधिकारी, म्हसवड. गाव गोंदवले बुद्रुक. सलग तीन पिढ्या डाॅक्टर असल्याने रुग्णसेवेचे बाळकडू आपोआप मिळालेले. प्रसिद्ध दमातज्ञ अशी ख्याती असलेले व हजारो रुग्णांना दम्यापासून मुक्तता देणारे डाॅ. चंदुलाल तांबोळी व आदर्श तालुका आरोग्य अधिकारी व माणदेश रत्न पासून शतायुषी पर्यंत अनेक पुरस्कार मिळवलेल्या डाॅ. रज्जाक चंदुलाल तांबोळी यांचा मी वारस.

        लहानपणा पासून पहिल्या नंबरने राहून बारावीत 94% मार्क्स मिळवून रात्रंदिवस अभ्यास करुन एम् बी बी एस् पूर्ण केले. शहराकडे जाणारी सर्व सुखे खुणावत असताना देखील पूर्वजांच्या पावलावर पाऊल ठेवून खेड्याकडे वळणे पसंत केले. वडिलांप्रमाणेच शासकिय अधिकारी होऊन सेवा करायचे ठरवले. लहानपणापासूनच माणदेशाची प्रचंड ओढ होती. परंतु  नाईलाजाने पाटण तालुक्यातून सेवेची सुरुवात करावी लागली. माण तालुक्यात यायला पाच वर्षे गेली. प्राथमिक आरोग्य केंद्र, पळशी व मार्डी येथे सेवा केली. प्रामाणिक व मनापासून काम करत असल्याने हळूहळू लोकांशी नाती जडत गेली, लौकीक होत गेला.

         दरम्यान म्हसवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची घडी खूपच विस्कळीत झाली होती व येथे वर्ष दीडवर्षात दहा ते बारा वैद्यकिय अधिकारी होऊन गेलेले. जिल्ह्यातील *71 प्रा.आ.केंद्रात म्हसवडचा नंबर 69 वा होता.* अवघ्या 20 ते 25 प्रसुती वर्षाकाठी व्हायच्या. म्हसवड चे वैद्यकिय अधिकारी पद म्हणजे साक्षात काळ्या पाणी शिक्षा हिच भावना आम्हा वैद्यकिय अधिकार्‍यांमधे होती. कामाची उद्दिष्टे पूर्ण न केल्यास म्हसवडला पाठवले जाईल असा सज्जड दम वरिष्ठ अधिकारी देत असत व त्या धास्तीनेच आम्ही वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी काम वेळेत पूर्ण करायचा प्रयत्न करत असू.

       अशा ठिकाणी नियुक्ती घेणेस काहीसा नाखूष असलो तरी हे आव्हान स्वीकारायचेच असा चंग बाधून कामाला सुरुवात केली. मागच्या तीन वर्षात म्हसवड प्रा.आ.केंद्रावरील असणारे सर्व कलंक पुसून टाकण्यास यश मिळाले. रोजच्या पेशंटची संख्या *शंभरी* गाठू लागली. वर्षाकाठी ज्या 20 ते 25 प्रसुती होत होत्या तो आकडा *पावणेतीनशे* च्या घरात गेला. सर्व कर्मचारी वर्ग सतर्क असल्याने एकाही गावात कसल्याही साथीची लागण झाली नाही. सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाची उद्दिष्टे वेळेआधी पूर्ण होऊ लागलीच पण राष्ट्रीय कार्यक्रम नसताना देखील कॅन्सरसारख्या असाध्य आजारावरच्या तपासण्या व शिबिरे येथे होऊ लागली व अनेक माता भगिनींना जीवनदान मिळाले. हा *म्हसवड पॅटर्न* आज माण पॅटर्न म्हणून संपूर्ण जिल्ह्यात राबवला जाऊ लागला. जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात राबवण्यात येणार्‍या कॅन्सर तपासणी शिबिरामधे टीम म्हसवड ला बोलवण्यात येऊ लागले. बघता बघता काम एवढे वाढले की प्रा.आ.केंद्र, म्हसवड *आयएस्ओ* झाले. हजारो रुग्ण लाभ घेऊ लागले. प्रा.आ.केंद्राच्या रॅंकिग मधे सुधारणा होत गेली आणि *सातारा जिल्ह्यामधे 69 व्या क्रमांकावर असलेले प्रा.आ.केंद्र, म्हसवड हे आज सातारा जिल्ह्यातील रॅंकिंग मध्ये प्रथम क्रमांकाचे केंद्र बनले.* म्हसवड प्रा.आ.केंद्राचा अभिमान असणार्‍या 108 अॅम्ब्युलन्स ची चाके अखंड फिरु लागली व अल्पावधीतच जिल्ह्यामधे या सेवेने देखील प्रथम क्रमांक मिळवला. आणि गत महिन्यात सर्वोच्च बहुमान मिळवताना या म्हसवड प्रा.आ.केंद्राने संपूर्ण महाराष्ट्रातून हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच घोषित करण्यात आलेल्या *फाइव्ह स्टार* केंद्रामधे नाव मिळवले. सातारा *जिल्ह्यातील हे एकमेव फाइव्ह स्टार प्राथमिक आरोग्य केंद्र.*

         पण आज मी व्यथित आहे. माझ्या प्रा.आ.केंद्रावर झालेला अकारण हल्ला हा माझ्या काळजावर घाव करुन गेला. 24 तास मुख्यालयी राहत असून मी केवळ दहा ते पंधरा मिनिटांसाठी पेट्रोल पंपावर गेलो असता अतिशय  लाजीरवाण्या व किळसवाण्या भाषेत माझा काहीही गुन्हा नसताना शिवीगाळ करण्यात आली. कोणताही रुग्ण सोबत नसताना केवळ बुलेटवरुन आलेल्या दोघांनी  प्रा.आ.केंद्रातील साहित्याची प्रचंड नासधूस केली. युपी व  बिहार मध्ये सुद्धा कितीही मोठे दंगे झाले तरी शेकडो रुग्णांचे प्राण वाचवणार्‍या जीवनदायिनी फोडल्याचे कधी ऐकिवात नव्हते ते माणदेशात घडले व माझी *108 क्रमांकाची रुग्णवाहिका* फोडण्यात आली. कधीही कुणाला न दुखवणार्‍या व गोरगरीब रुग्णांशी माझ्यापेक्षाही काकणभर अधिक जवळीक असणार्‍या माझी डाॅक्टर पत्नी सौ. समीना हिला अतिशय हीन भाषेत अरे तुरे करुन शिवीगाळ करण्याची मर्दुमकी गाजविण्यात आली. *तुमचा कोण पेशंट आहे काय त्रास आहे आपण तपासून पाहू* असं म्हणत असताना देखील माझ्या *लहान मुलांसमोर* तिला शिवीगाळ करण्यात आली. *रात्रभर मुले भेदरलेल्या अवस्थेत होती.* माझा सर्व 24 तास मुख्यायली राहणारा स्टाफ प्रचंड दहशतीखाली होता. असे असताना देखील या सर्वांवर कडी करत एका वृत्तपत्राने *प्रत्यक्ष डाॅक्टरांना शिवीगाळ होऊनही* डाॅक्टर गैरहजर असल्याने प्रा.आ.केंद्राची मोडतोड अशी धादांत खोटी हेडलाइन देऊन लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील विश्वास डळमळीत केला.

       आज मनस्थिती उद्विग्न आहे. समाजातील ज्या वर्गासाठी आम्ही काम करतो तो गरीब रुग्णांच्या वर्गामधे अन्यायाविरुद्ध एकवटण्याची व आमच्या बाजूने उभे राहण्याइतकी ताकद नाही हे दुर्दैव मोठे असल्याची जाण मला आहे. आज या ठिकाणी काम करण्याची मानसिकता राहीली नाही. वादळ येऊन गेले असले तरी त्याच्या खुणा लवकर पुसल्या जातील असे वाटत नाही. माण तालुक्यापर्यंत हे लोण यावे याचेही दु:ख मोठे आहे. मनात साचलेले दु:ख कोणत्या तरी रितीने बाहेर यावे यासाठीच हा शब्दप्रपंच. घाव जरी भरुन आले तरी व्रण बराच काळ राहतील आणि एकच प्रश्न ह्रदयावर दस्तक देत राहील की माझे काय चुकले?

*या घटनेनंतर म्हसवड शहरातील मान्यवर माझे जवळपास सर्वच पत्रकार बंधू नागरिक यांनी प्रत्यक्ष भेटून या घटनेचा निषेध करुन प्रा आ केंद्रास पाठिंबा व्यक्त केला. तालुक्यातील जवळजवळ सर्वच वरिष्ठ अधिकारी यांनी आस्थेने विचारपूस केली व मनोबळ वाढवले. याचबरोबर अखिल भारतीय कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकिय अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य नर्सेस संघना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना यांनी तातडीने या घटनेची माहिती घेऊन असंख्य कर्मचारी अधिकारी यांचे पाठबळ उभे केले. या सर्वांचा मी शतश: ऋणी राहीन.*

*डाॅ. समीर तांबोळी*
मेडिकल आॅफिसर, म्हसवड.
मोबा. 09423828834, 09403684889

मोबाईल हक्क असेल तर कर्तव्यसुचनाही समजून घ्या/द्या

आई, आयफोन आणि १८ अटी****

जेनेल हॉफमन या अमेरिकन आईनं आपल्या १३
वर्षाच्या मुलाला आयफोन घेऊन दिला. आणि
त्याबरोबर घातल्या काही अटी. जगभरातल्या आयांमध्ये
चर्चेचा विषय ठरलेली
ग्रेगच्या मॉमची ही गोष्ट.

जेनेल हॉफमन ही एक अमेरिकन आई. तिला एकूण पाच मुलं आहेत.
तिचा १३ वर्षाचा ग्रेग शाळा सुरू झाल्यापासून तिच्या मागे
भुणभुण करत होता की, मला
माझा स्वत:चा मोबाइल हवाय आणि तोही आयफोनच!

शेवटी जेनेलच्या लक्षात आलं की, आयफोन हे
काही ग्रेगच्या डोक्यातलं तात्पुरतं
खूळ नाही.
शेवटी तिनं आणि तिच्या नवर्यानं निर्णय
घेतला आणि गेल्या ख्रिसमसला ग्रेगला
त्याचं गिफ्ट मिळालं - आयफोन!

पण जेनेलनं आणखी एक गोष्टही तिच्या मुलाला दिली
त्याच्यासाठी आणलेल्या
नव्याकोर्या आयफोनच्या खोक्यात तिनं एक चिठ्ठी ठेवली होती.
आयफोन हातात
आलेल्या मुलासाठी काही नियम होते त्या चिठ्ठीत.
जेनेल इंटरनेटवर स्वत:चा ब्लॉग लिहिते.
ग्रेगला लिहिलेली ती चिठ्ठी तिनं नंतर
आपल्या ब्लॉगवर टाकली आणि जगभरातल्या आया ते वाचून
भलत्याच खूश झाल्या.
लहान वयात टेक्नॉलॉजी हाताळण्यासाठी उतावीळ
असलेल्या हल्लीच्या मुलांना कसं
आवरावं आणि त्या टेक्नॉलॉजीच्या दुष्परिणामांपासून त्यांना कसं
दूर ठेवावं या
चिंतेत असणार्या आयांना जेनेलनं आपल्या या ब्लॉगमधून जणू
एक नवा मार्गच
दाखवला आहे.

’माझ्या मुलाला तंत्रज्ञानाचं व्यसन लागू नये, त्यानं
त्याचा दुरुपयोग करू नये
असं मला वाटत होतं. तंत्रज्ञानाच्या आहारी न
जाता त्याचा उत्तम उपयोग कसा
करावा हे माझ्या मुलानं शिकावं असं मला वाटत होतं म्हणून
मी त्याला एकूण १८
अटी घातल्या ‘-

जेनेल हॉफमन लिहिते.
जेनेलच्या या १८ अटी सध्या इंटरनेटवर भलत्याच चर्चेत आहेत.
त्यांचा हा अनुवाद

प्रिय ग्रेग,

१. हा आयफोन
तुझ्यासाठी आणला असला तरी त्याची मालकी माझी आहे, कारण
याचे पैसे
मी दिलेले आहेत. हा फोन तुझा नाही,
तो मी तुला वापरायला दिलेला आहे, हे लक्षात
ठेव.

२. त्या फोनला पासवर्ड टाकलास, तर
तो मला माहिती असला पाहिजे.

३. रिंग वाजली की फोन उचलायचा. तो ’फोन’ आहे. त्यावर
तुझ्याशी बोलता येणं हा
त्याचा मूळ उपयोग आहे. शिवाय फोन न उचलणं असभ्यपणाचं
आहे. त्यामुळे ‘मॉम‘किंवा
‘डॅड’ हे नाव फ्लॅश झालं की तो फोन उचलायचा..लगेच!

४. रोज संध्याकाळी ७.३0 वाजता आणि शनिवार-
रविवारी रात्री फोन माझ्याकडे
द्यायचा. मी तो फोन रात्री बंद करीन आणि सकाळी ७.३0
वाजता चालू करून परत तुला
देईन. रात्री उशिरा तुला एखाद्या मित्राला, मैत्रिणीला फोन
करायचा झाला, तर तो
त्यांच्या घरच्या फोनवर करायचा. त्यांच्या आई-वडिलांपासून
लपवण्यासारखं त्यात
काही असेल, तर असा फोन न करणंच उत्तम.

५. फोन शाळेत घेऊन जायचा नाही. ज्या कुणाशी तुला फोनवरून
चॅटिंग करावंसं वाटतं
त्यांच्याशी प्रत्यक्ष बोल. गप्पा मार. ही गोष्ट छान आयुष्य
जगण्यासाठी फार
आवश्यक आहे.

६. हा फोन पाण्यात पडला, संडासात पडला, हरवला, फुटला किंवा त्याचं काहीही नुकसान झालं तर त्याच्या दुरुस्तीचा किंवा रिप्लेसमेंटचा खर्च
करणं ही तुझी जबाबदारी असेल. त्यासाठी तू सुट्टीत काम करू शकतोस, वाढदिवसाच्या पार्टीचे पैसे वाचवू शकतोस किंवा खाऊला दिलेले पैसेही त्यासाठी वापरू
शकतोस. फोनच्या बाबतीत अशा गोष्टी होतात. त्यामुळे त्याची तयारी ठेव.

७. या फोनचा वापर कधीच कोणाशी खोटं बोलायला किंवा कोणाला फसवायला करू नकोस.
भांडणं झाली तर एक चांगला मित्र जसा वागेल तसा वाग आणि नाहीतर त्या भांडणात पडू नकोस.

८. ज्या गोष्टी तू प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीला सांगू शकत
नाहीस त्या एसएमएस, मेल
किंवा फोन करून सांगू नकोस.

९. एखाद्या मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या आईवडिलांसमोर तू
जी गोष्ट बोलणार
नाहीस, ती फोन वापरून लपून मेल, एसएमएस किंवा फोन करून
सांगू नकोस.

१0. फोनवर कुठलंही साहित्य उघडायचं नाही. तुला इतर
कामासाठी, प्रोजेक्टसाठी जी
माहिती हवी असेल त्यासाठी जरूर फोनवरचं इंटरनेट वापर. पण
त्याव्यतिरिक्त तुला
काही प्रश्न असतील तर माझ्याशी किंवा डॅडशी मोकळेपणानं
बोल.

११. सार्वजनिक ठिकाणी, थिएटरमध्ये, हॉटेलमध्ये
किंवा कुठल्या माणसाशी बोलत
असताना फोन सायलेंट कर किंवा बंद कर, पण तो बाजूला ठेवून दे.
समोरचा माणूस
बोलत असताना आपण फोनशी खेळ करणं उद्धटपणाचं आहे.
शिवाय आयफोन ही बोलण्यासाठी
वापरायची एक गोष्ट आहे. तो मिरवायचा स्टेट्स सिम्बॉल नाही.

१२. तुझ्या स्वत:च्या किंवा इतर कोणाच्या खासगी भागांचे
फोटो काढून ते शेअर
करू नकोस. हसू नकोस! मला माहिती आहे की तुला सगळं समजतं.
पण तरीही तुला असा मोह कधीतरी पडू शकतो. सायबर स्पेस खूप मोठी आहे आणि इथे एकदा आलेली प्रत्येक गोष्ट, वाक्य, फोटो, कॉमेंट कायम इथेच राहतं.
अशा एखाद्या गोष्टीमुळे तुझं
संपूर्ण आयुष्य बरबाद होऊ शकतं.

१३. उगीच हजारो फोटो आणि व्हिडिओ काढत बसू नकोस.
प्रत्येक गोष्ट काही फोटो
काढून ठेवण्याइतकी महत्त्वाची नसते. त्यापेक्षा तो क्षण
मनापासून एन्जॉय कर, ते
तुझ्या कायम लक्षात राहील.

१४. कधीतरी फोन घरी ठेवून बाहेर पड. फोन बरोबर नाही म्हणजे
काहीतरी चुकतंय, काहीतरी
राहून जातंय असं वाटून घेऊ नकोस. फोन न नेल्यामुळे काही गोष्टी मिस् होतील. तर त्या होऊ देत. पण त्या वेळात तुला जे मिळेल ते त्या
'फिअर ऑफ मिसिंग आऊट’पेक्षा
मोठं असेल.

१५. सगळे जण ऐकतात त्यापेक्षा वेगळं संगीत ऐक. शास्त्रीय
संगीत ऐक. तुम्हाला
आजवर कधीच नव्हतं एवढं संगीत नेटवर सहज उपलब्ध आहे.
त्याचा फायदा घे.

१६. मेंदूला ताण देणारे खेळ, शब्दांचे खेळ, कोडी मधून मधून खेळत
जा.

१७. डोळे कायम उघडे ठेव. खिडकीच्या बाहेर काय आहे ते बघ.
पक्ष्यांचे आवाज। येतात का ते बघ, पाऊस हातावर घेऊन बघ, पायी
चक्कर मारायला जा.

गूगलशिवाय इतर
गोष्टींमधली मजा समजून घे.

१८. मला माहितीये की तू यातले नियम मोडशील. मग मी फोन
काढून घेईन.
मग आपण
त्यावर बसून चर्चा करू.
मग तू परत प्रॉमिस करशील. मग
मी तुला फोन परत देईन.
आपण पुन्हा सुरुवात करू..
काय? चालेल नं?
आयफोनबरोबर कसं
वागायचं हे तू
पहिल्यांदा शिकतो आहेस,
तशी माझीही ही पहिलीच तर वेळ आहे.

- मला अशी आशा आहे की, या अटी तुला मान्य असतील.
यातल्या बहुतेक सगळ्य़ा अटी
जरी नुसत्या फोनच्या बाबतीतल्या वाटल्या तरी त्या एकूणच
आयुष्याबद्दल आहेत. तू
आणि तुझ्या आजूबाजूच्या गोष्टी..
रोज बदलतायत, रोज
वाढतायत.
हे खूप एक्सायटिंग
आहे पण त्याचबरोबर खूप कॉम्प्लिकेटेड आहे. त्यामुळे
होता होईल तेवढय़ा गोष्टी
साध्या सरळ सोप्या ठेवायचा प्रयत्न कर.
आणि सगळ्य़ात
महत्त्वाचं म्हणजे
कुठल्याही तंत्रज्ञानापेक्षा तुझं मन आणि तुझी बुद्धी यावर
जास्त विश्वास ठेव.
तुझ्या नवीन आयफोनसाठी खूप खूप शुभेच्छा!

तुझीच,
मॉम****""

Sunday, 11 June 2017

शिक्षणाची भाषा/माध्यम: एक विचार

💥💥💥💥महाराष्ट्र वैद्यकीय प्रवेश परीक्षेत केवळ १७ % परीक्षार्थी किमान पात्रता गुण मिळवू शकले आहेत. खुल्या गटासाठी ५० % आणि जातीगत आरक्षण प्राप्त गटासाठी ४० % गुण ही किमान पात्रता निश्चित केलेल्या या परीक्षेतील कामगिरीचा महाराष्ट्रातील नीचांक काल गाठला गेला. जगातील सर्व शिक्षणतज्ज्ञ
शालेय शिक्षण स्थानिक भाषेत घेण्याची शिफारस करत असताना मुलांसाठी हट्टाने इंग्रजी माध्यमाची निवड केलेल्या पालकांच्या मुलांना त्या निर्णयाचा फटका बसला. इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे *व्यसन* कमी प्रमाणात असलेल्या मराठवाड्याचा निकाल सर्वाधिक २१.६१ % तर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे *व्यसन* अधिक प्रमाणात असलेल्या पुणे, मुंबईसह उर्वरित महाराष्ट्राचा निकाल केवळ १३.९९ % लागला. पुणे, मुंबईतील चुकीच्या शालेय भाषामाध्यम निवडीमुळे उर्वरित महाराष्ट्राची ही कामगिरी अगदी इंग्लंडच्या तोडीस तोड हलक्या दर्जाची झाली.

उरलेले ८३ % विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवेदनही करू शकणार नाहीत. त्यांना केवळ वैद्यकीय शिक्षणाचे दारच बंद झाले नाही तर त्यांचा एकूण  आत्मविश्वासही खच्ची झाला. शिक्षण, शिक्षणाचे माध्यम याबाबत स्वत:चा कसलाही अभ्यास नसणाऱ्या फुकट फौजदारांनी

* जगाची भाषा इंग्रजी
* इंग्रजी ही ज्ञानभाषा
* विज्ञानासाठी इंग्रजी माध्यम अत्यावश्यक

या तीन *अंधश्रद्धा* महाराष्ट्रात रूजवल्याने गेली तीस वर्षे महाराष्ट्रात इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे *व्यसन* रूजले असले तरी पालकांनी आता मुलांच्या हितासाठी माध्यम निवडीबाबत अधिक  गंभीरपणे विचार केला पाहिजे

नवतरूण पालकांनी वरील अंधश्रद्धांना बळी न पडता मुलांच्या शालेय शिक्षणासाठी मराठी हे प्रगत, समृद्ध, संपन्न दर्जेदार भाषा माध्यम निवडावे.

पूर्वी इंग्रजी माध्यम निवडण्याची चूक केलेल्या पालकांनी माध्यम बदलून मराठी माध्यम निवडले तर मुलांची भविष्यातील कामगिरी सुधारू शकेल. ही संधी अवश्य साधा.

BM🙏🙏 🙏🙏