Sunday, 11 June 2017

शिक्षणाची भाषा/माध्यम: एक विचार

💥💥💥💥महाराष्ट्र वैद्यकीय प्रवेश परीक्षेत केवळ १७ % परीक्षार्थी किमान पात्रता गुण मिळवू शकले आहेत. खुल्या गटासाठी ५० % आणि जातीगत आरक्षण प्राप्त गटासाठी ४० % गुण ही किमान पात्रता निश्चित केलेल्या या परीक्षेतील कामगिरीचा महाराष्ट्रातील नीचांक काल गाठला गेला. जगातील सर्व शिक्षणतज्ज्ञ
शालेय शिक्षण स्थानिक भाषेत घेण्याची शिफारस करत असताना मुलांसाठी हट्टाने इंग्रजी माध्यमाची निवड केलेल्या पालकांच्या मुलांना त्या निर्णयाचा फटका बसला. इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे *व्यसन* कमी प्रमाणात असलेल्या मराठवाड्याचा निकाल सर्वाधिक २१.६१ % तर इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे *व्यसन* अधिक प्रमाणात असलेल्या पुणे, मुंबईसह उर्वरित महाराष्ट्राचा निकाल केवळ १३.९९ % लागला. पुणे, मुंबईतील चुकीच्या शालेय भाषामाध्यम निवडीमुळे उर्वरित महाराष्ट्राची ही कामगिरी अगदी इंग्लंडच्या तोडीस तोड हलक्या दर्जाची झाली.

उरलेले ८३ % विद्यार्थी वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवेदनही करू शकणार नाहीत. त्यांना केवळ वैद्यकीय शिक्षणाचे दारच बंद झाले नाही तर त्यांचा एकूण  आत्मविश्वासही खच्ची झाला. शिक्षण, शिक्षणाचे माध्यम याबाबत स्वत:चा कसलाही अभ्यास नसणाऱ्या फुकट फौजदारांनी

* जगाची भाषा इंग्रजी
* इंग्रजी ही ज्ञानभाषा
* विज्ञानासाठी इंग्रजी माध्यम अत्यावश्यक

या तीन *अंधश्रद्धा* महाराष्ट्रात रूजवल्याने गेली तीस वर्षे महाराष्ट्रात इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाचे *व्यसन* रूजले असले तरी पालकांनी आता मुलांच्या हितासाठी माध्यम निवडीबाबत अधिक  गंभीरपणे विचार केला पाहिजे

नवतरूण पालकांनी वरील अंधश्रद्धांना बळी न पडता मुलांच्या शालेय शिक्षणासाठी मराठी हे प्रगत, समृद्ध, संपन्न दर्जेदार भाषा माध्यम निवडावे.

पूर्वी इंग्रजी माध्यम निवडण्याची चूक केलेल्या पालकांनी माध्यम बदलून मराठी माध्यम निवडले तर मुलांची भविष्यातील कामगिरी सुधारू शकेल. ही संधी अवश्य साधा.

BM🙏🙏 🙏🙏

No comments:

Post a Comment