Monday, 23 October 2017

आसव अरिष्ट आणि विष, विषमत

विष, विषमता आणि आसव अरिष्ट !!! व्याख्या अ: आसव व अरिष्ट म्हणजे आयुर्वेदात वर्णन केलेला औषधाचा एक विरजण प्रकार. विरजण म्हणजे समजण्यास: बेकरी (दही, बिस्कीट, पाव ईत्यादी) उत्पादने हेही विरजणाचा एक प्रकार. व्याख्या ब: विषाबद्दल अधिक काय सांगावे!! विषाद उत्पन्न करते ते ही शास्रीय व्याख्या. स्वसंरक्षणार्थ जीवांनी ईतरांना गलीतगात्र करण्यासाठी बनवलेले किंवा चांगले पण अति वा अयोग्य प्रमाणात घेतल्याने शरीरात पुर्ण पचनाअभावी घातक झालेले घटक हि जनसुलभ व्याख्या! व्याख्या क: आयुर्वेद फक्त शारीरीक वा वैयक्तिक आरोग्यविचार नाही तर मन, मनापलीकडेही व सामाजिक आरोग्याचेही भान राखतो. विषमता म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपल्यासमान न मानण्याची वृत्ती व त्याअनुषंगाने कृती. व्याख्या ड: लिखाण/शब्दप्रपंच हा वैद्याचा प्रांत नव्हे. परंतु मद्यनिषेध कानीकपाळी ओरडून सांगणारा डॉ. अभय बंग प्रणित 'मद्यमुक्त महाराष्ट्र' चे समर्थन करणारा शिवाय डॉक्टर/वैद्य जेव्हा तत्सम गुणयुक्त वाटणार्या आसव अरिष्टाची प्रशस्ती करतो तेव्हा त्याचा 'भुमिकाबदल झाला/केला काय?' (तंत्रयुक्तीतील शब्द शोधूनही सामान्य माणसाला कळेल का? म्हणून हा सोपा शब्द वापरला) वाटणे हा भ्रम होऊ नये म्हणून हा विष ते औषधाचा, सामाजीक समतेचे उद्दीष्ट व साधन यातील फरक दाखवण्याचा संदेश !!! आजकालच्या फास्ट जगात {१}फास्ट (आशुकारी) रिझल्टसाठी तसेच काढा, चाटण, लेप अशांचा कंटाळा करणार्यांसाठी {२} रेडीमेड आणि टिकाऊ स्वरुपात म्हणून हल्ली वैद्यही आसव अरिष्ट यास प्राधान्य देऊ लागतात. बंदुकीची गोळी हाताने फेकून मारली तर अधिक 'गुणकारी' काम साधेल कि बंदूकीतून मारल्यावर: तसेच औषधे तीच जी वैद्य निवडतात/मागणी करतात, पण त्याचेच आसव अरिष्ट बनवल्यास गुण गोळीबंद तडाखेबाज!!! नाही का? विष व मद्याचे गुण जवळजवळ समकक्ष आहेत. {3} काट्याने काटा काढणे हा कर्मसिध्दांतही(म्हणजे कामी येणारा) आयुर्वेद वापरते. यथाद्रव्योगुणो$रिष्ट: {४} अन्न व औषधांपासून शास्त्रोक्त पध्दतीने बनवलेले आसूत/विरजणानंतरचे संयुग हे आयर्वेदाची जीवनशैलीविषयी बांधीलकीही स्पष्ट करते. उदा. अश्वगंधारिष्ट, जीरकादीरिष्ट वगैरे. याखेरीज {५} मात्रा/डोस कमी होणे हा भागही साधला जातो असं म्हणतात कि बुध्दकालात अहिंसेचा अतिरेक झाल्याने 'शल्यतंत्रा'ची (Surgical wing) पिछेहाट झाली. त्यामुळे काळावर मात करुन तंत्र टिकवणे हाही कला/विद्यातंत्राचा भाग. उत्तम आसुतांची {६} परंपराही जतन व संशोधीत/संशुध्दीत करणे हाही त्याचाच एक भाग आता विषमतेचे स्मरण का व्हावे ? तर मद्य (मदमोहादी षडविकारापैकी मद निर्माण/वाढ करणारे) हे सामाजिक आरोग्याला तसे घातकच; पण जगात प्रत्येक जण वैशिष्ट्यपुर्ण(unique) रितीने वेगळा व आपण जाणतोच 'विविधतेतून एकता' (विविधता विलीनीकरणातून नव्हे तर विविधता मर्यादेत राखून) हे भारता (आयुर्वेदजनक) चे ब्रिदवाक्य!! त्यामुळे {७} पेशींचा मद व स्ववैशिष्टय यातील फरक जाणणारा वैद्य निश्चितच मद्य व आसूत भेद जाणू, वापरु शकेलच!!! दुसरे म्हणजे मन किंवा वृत्तीतील विषमता हि कुठल्या तरी हव्यासातूनच यैते ना!! मग हि विषमतापूरक वृत्ती हि सद्य किंवा भविष्यकालीन अशाश्वतता किंवा लोभादींच्या सानिध्यानेच येते. यावर ऊत्तर म्हणूनच हरीवंशराय बच्चन यांनी 'मधुशाला' नामक काव्य रचून मार्मीक समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहेच. त्याचप्रमाणे अतिरिक्त 'स्व' (मीपणा, माझे~माझे म्हणा हवं तर) ला कमी करण्याचा भागही या विषमगुणी द्रव्यातून साधला जाणे अपेक्षित असते. आयुर्वेद संकल्पना रुग्णास सुलभ करण्याचे वैद्यांचे प्रचार, प्रयत्न, {८} प्रयोगशीलता रुजवणे चालूच असतात. {९} सण वा शंका/चौकशी निमित्तेने ते लोकासमोर येतात वा उजळणी होते. यातून कंपनीला {१०} औषध बनवताना कच्च्या मालाची गुणवत्ता, पर्याय, शुध्दी (एका एका श्रूतीने राग बदलतो तसे दुधापासूनचे द्रव्य बदलते, त्यापैकी एक ताक व त्याचेही ४, दुसर्या वर्गीकरणात ९ प्रकार आहेत), किंमत कमी राखण्याचे उपाय व प्रभाव काळ टिकवण्यासाठीची {११} अनौषधी/केमिकल द्रव्ये(preservative etc.), {१२} तयार फॉर्म्यूल्यात रुग्णसापेक्ष बदल (उदा. गाईचे ताकाऐवजी म्हैस/शेळीचे) अशा अनेक गोष्टिंवर येणार्या मर्यादा व त्यावर वैद्य कसे मात करतात, अशा गोष्टीचे आकलन होऊ लागते. लिहावे तेवढे थोडेच ! म्हणून या आसव अरिष्ट औषधकल्पनेमागील 'विषहेतू' ने गरज तिथे विषमतेच्याही सुयोग्य/सम्यग योगाने समतेचा मार्ग प्रशस्त होओ हि सदीच्छा ! जिज्ञासूंसाठी प्रश्नोत्तरी व काही चुक वाटले तर दुरुस्तीला वाव आहेच!!! किंवा भेटू पुढील सणनिमित्ताने! आपला: हरीतक्री. 8087439690. 9372454022. १ ते १२: जलद वैशिष्ट्ये/संदर्भ मुद्दे. प्रत्येक मुद्दा स्वतंत्र लेख/प्रकरणाचा विषय; परंतु संक्षेपाने/उल्लेख मांडण्याचा प्रयत्न.

No comments:

Post a Comment