घृत
घृतमाज्यं हविः सर्पिः कथ्यन्ते तद्गुणा अथ |
घृतं रसायनं स्वादु चक्षुष्यं वह्निदीपनम्॥१||
शीतवीर्यं विषालक्ष्मीपापपित्तानिलापहम् |
अल्पाभिष्यन्दि कान्त्योजस्तेजोलावण्यवृद्धिकृत्॥२||
स्वरस्मृतिकरं मेध्यमायुष्यं बलकृद्गुरु |
उदावर्तज्वरोन्मादशूलानाहव्रणान् हरेत् |
स्निग्धं कफकरं रक्षःक्षयवीसर्परक्तनुत्॥३||
Sunday, 19 November 2017
तुप आणि कोलेस्टिरॉल २
Saturday, 18 November 2017
तुप व कोलेस्टिरॉल
*तूप खाल्ल्याने रूपच येतं*
*Cholesterol वाढत नाही...!!!*
आजकाल बरीच *सुशिक्षित पन स्वास्थ्या बाबतीत अर्धशिक्षित मंडळी* असल्या कारणाने बोलावे क़ाय जरा प्रश्नच पडतो..??
*कारण आपन Contious नाही तर फक्त Cautious आहोत...*
यात अजुन भर पाडल्या जाते ती दिखाऊ दिमाखदार अशा इतर मंडळी ची...
*क़ाय तर तूप खाऊ नका...*
*रक्तातिल fat वाढेल...*
*Cholesterol...😳😳😳*
*Block...*
*Attack...*
अरे..रे...रे...!!!
*क़ाय करावे बर अशा तुपाच्या विरोधकाचं..???.🤔🤔🤔*
अगोदर आपली संकल्पना आपन कलुन घेऊ मग ...यांच्याकडे पाहू ...
आयुर्वेदात अग्नि ला अनन्य साधारण महत्व आहे...👌👌👌
आणि तो अग्नि धगधगता🔥🔥🔥 ठेवायचा तर त्याला स्नेहा च्य गरज आहे हे सांगावे आणि ते ही आपल्या आयुर्वेदिक जनतेला...जरा वावगे ठरेल... हो...!!
*आपन एखादा यज्ञ करतो तर ...त्यात तुपाचीच ... नाही तर शुद्ध देसी गावरण तुपाची आहुति देतो...🔄*
*का..??*
*तर तो अग्नि पेटलेला असावा... किवा यज्ञ यशस्वी व्हावा... त्यापासुन जो धूपन निर्माण होतोय त्याने आपल्या आजु बाजुचे वातावरण शुद्ध व्हावे ...असेच...!!!*
अशीच काही परिस्तिथि आपली आहे...
मग त्याला ही तूप आवश्यक असनारच...ना...👍👍👍
बहुतेक इथपर्यंत मी बरोबर आहे...
*आता cholesterol का वाढते..??*
क़ाय व्हायलय...!!!
ह्या पाश्चिमात्य गोष्टीचा आणि ह्या विज्ञापना चा भाड़ीमार ...आणि एक विशिष्ट वर्ग ( आपल्या ला कलालेच असेल मला क़ाय म्हणायचे ते...)
*Packed foods...*
*Preservative Foods...*
*Oily...*
*Spicy...*
*Non veg...*
*काहीही गरज नसताना market preparation बनवून चांगल्या शुद्ध आहराच्या नावा खाली....*
.
.
.
*बऱ्याच Chemical युक्त दिखाऊ पन न टिकाऊ...!*
*फळे सुद्धा...🍏🍎🍊🍌🍇🍌*
अशी बरीच अन्न पदार्थ आहेत की *त्यांच्या विचित्र मिश्रनामुळे वेगळेच रसायन बनते* आणि *अशा Chemical लोचा मुळे वेगळीच प्रक्रिया घडून येते...*
आणि स्वास्थ्य च्य नावाखाली
मग सुरु होतो आमचा कत्तल खाना...👍
असो ..!!!
मला एव्हड़ च म्हणायचे आहे ...
Cholesterol वाढते ते
*यकृततिल प्रक्रियेत (क्रिया) असमतोल निर्माण झाल्याने...*
*Cholesterol वाढते ते त्याच धातु पेशितील Resepter च्या बन्धनात आलेली घट..*
*आणि असे वेगळी कारणे...👌*
म्हणजेच, *शुद्ध तूप खल्ल्या ने रक्तातील अतिरिक्त मेद वाढत नाही तर, ते वाढते यकृताची प्रक्रिया मन्दावल्याने किवा रूपांतर प्रक्रियेत कुठे तरी गड़बड़ घोटाळा झाल्याने...*
आणि हे होते ते *आपल्या ब्रम्हांडात(पोटात) झालेल्या घोटाळ्याने...!!!*
*ब्रम्हांडआत(पोटात) घोटाळा झाला तो*
*दिखाऊ अशा आणि अपथ्य आहाराने...!!!*
यज्ञ मध्ये शुद्ध तुपाची आहुति झाल्यावर जो धूपन होतो त्याने जी ऊर्जा, वतावर्णातिल शुद्धता प्राप्त होते ,
तीच परिस्तिथि शुद्ध तुपामुळे आपल्या ही शरीरात घडते
*तूप*
⬇
*पाचकाग्नि*
⬇
*धात्वाग्नि*
⬇
*धातु*
⬇
*दोष शुद्धि*
*विशेषत: वायु*
*आणि त्यात ही*
*व्यान आणि प्राण*
⬇
*धमनी काठिन्य नाही आणि रक्तात अति प्रमाणात Cholesterol नाही...😎😉😘*
*निरोगी शरीर..*
*आरोग्य प्राप्ती...*
आणि असे म्हणणे काहीच वावगे ठरणार नाही....!!!
*आपलाच,*
*वैदय प्रवीण क. बनमेरु,*
*जालना*
🙏🏻🙏🏻🙏🏻
Friday, 17 November 2017
अँजिओप्लँस्टिबद्दल सुधारीत विचार १
For nearly half a century, cardiologists have been performing angioplasty and inserting stents to treat heart attack, worsening chest pain (angina), or other symptoms
However a landmark study published in the prestigious journal, The Lancet has showed that this procedure produces the same result if the doctor does nothing but tells the patient that something has been done (the benefit is just due to the Placebo effect and not the treatment)
https://www.theatlantic.com/health/archive/2017/11/placebo-effect-of-the-heart/545012/
Thursday, 16 November 2017
आयुर्वेद सिध्दांत सोपे करणार्या कल्पना
[11/16, 5:03 PM] +91 75881 55361: *विसर्गोदानविक्षेपै:सोमसुर्यानिला यथा।*
*धारयन्ती जगातद्येहं कफपित्तानिलास्तथा*। - सु. सु. २१/८
👉🏻ज्या प्रमाणे चंद्र, सूर्य आणि वायू आपल्या विसर्ग, आदान, विक्षेप या कार्याद्वारे संसाराचे धारण करतात त्याच प्रमाणे वात, पित्त, कफ देखील या देहाचे धारण करतात.
*विकृताSविकृता देहं घ्रन्ति ते वर्तयन्ति च।*
- अ.सं सु. १/२१
👉🏻दोष जेव्हा विकृत असतात तेंव्हा शरीराचा नाश करतात परंतु हेच दोष जेंव्हा अविकृत(साम्यावस्थेत) असतात तेंव्हा ते शरीराचे धारण करतात व आयुष्याचे संरक्षण करतात.
*वायु:पित्तं कफो दोषा धातवश्च मलस्तथा ।।*
- शा. पु.५/४१
👉🏻शारंगधरांनी तर दोषांना *धातु* ही संज्ञा बहाल करून देहधारणात त्यांचा अतीशय महत्वाचा वाटा विशद केलाय.
.
.
.
.
.
.
.
परंतु आयुष्याला अपकारक व उपकारक असे हे त्रिदोष अथवा त्रिदेव अनेकानेक कारणांनी आपली अवस्था सतत बदलत असतात.
*रोगस्तू दोषवैषम्यं दोषसाम्यरोगता।*
- अ.सं.सु१
👉🏻या देहाचे धारण करणाऱ्या, व्याधी उत्पत्तीमधे अतिशय महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तसेच यांच्या साम्यतेकडे व्याधीप्रतिबंधात्मक म्हणूनही आपण बघू शकतो असे हे त्रिदोष, धातु अथवा मल.
आणि
त्यातही महादेव म्हणजे *वात*🙆🏻♂, 'ज्यांचे' प्राधान्य वर्णन करतांनाचा
*पित्तं पंगू कफं पंगू……….।।* हा श्लोक, -च.सु.१२, - सु.नि.१ हे आपणा सर्वांना ज्ञात आहेच.
खरोखरच *त्रिदोष साम्यता* ही एनकेनप्रकारे परंतु प्राधान्यानेच सांभाळण्याजोगी बाब! 🙏🏻
[11/17, 8:02 AM] +91 75888 76222: *आशयापकर्षगती*
जरा ऐकायला भयंकरच!!
ग्रुप वर एक student ,आता आमची छोटी ताई,तिने टाकलेली ही गुगली!
असो घेतला वसा टाकू नये, असे म्हणतात तेच खरे!
अगदी खरे सांगतो, माधव निदान काढावे लागले!!
तर मूळ मुद्दा!
ही जरा वेगळीच गती आहे हे मात्र खरं!
या गतीचा कोष्ठ शाखा किंवा शाखा कोष्ठ असा प्राकृत
प्रवास नक्कीच नसतो।
वायू चा सहभाग मात्र अगदी आवर्जून असतो।
कारखानदार बनायला हवं पुन्हा!!
सकाळच्या शिफ्ट मधील कफ कामगार संख्येने कमी ( एखाद्या ठिकाणी चा कफक्षय) झाले तर तिथे कफक्षयची (म्हणजे कामगारांची उणीव) लक्षणे दिसून येतात।
आता ही तर साधी संप्राप्ती झाली, हो ना!
मग नवीन काय यात?
इथे वाहतूक करणारा वात शांत बसेल तर शप्पथ।
बरोबर डोकं लावून ही ड्राइवर मंडळी दुपारच्या पित्त मंडळी ची काही लोकं सकाळच्या ड्युटी मध्ये त्या कामाची झीज भरून काढण्यासाठी घेऊन जातात।
उपयोग होत तर नाहीच पण जिथे कफ क्षयाची लक्षणे दिसत होती तिथे पित्ताची लक्षण दिसू लागतात।
गंमत सांगतो।
कोरड्या खोकल्यावर ब्रांडी पिल्यावर पिवळा कफ पडतो हा अनुभव घेतलाय?
वातज कास-----म्हणजे कफक्षयच--------साधे लसूण सिद्ध तीळ तेल ड्रॉप method ने घेतलं तर आराम नक्की पडणार असा विचार!
पण हुशार मंडळी ब्रांडी प्यायचे निमित्त शोधतात आणि इथेच गच्चा होतो।
स्रोतो विवृत्त्व होते आणि खोड्या काढण्याची वाट पाहत असलेला वात आमाशयातील पित्ताला शाखगत करतो आणि हे विकृत पित्त फुफ्फुस च्या ठिकाणी जमा व्हायला सुरू होते आणि खोकल्यातून पिवळा कफ पडायला सुरुवात होते।
वाताने केलेल्या या खोडसाळ पणाला आशयापकर्ष गती म्हणतात।
थोडक्यात osmosis या physics च्या प्रोसेस प्रमाणे।
कोरडे बनियन पाण्यात थोडे भिजवून उभे धरा।
पाणी वर चढायला लागते।
अगदी तसा विचार!!!!
धन्यवाद!
-----------------------------
*वैद्य भरत कुमार प्र जाधव*
*फोन-9552361074*
Wednesday, 15 November 2017
नि:संशय ! नि:श्रेयस !!
Tuesday, 14 November 2017
आयुर्वेद रुग्णपत्र १
[10/26, 1:03 PM] +91 99225 56653: *आयुर्वेदा मुळे पुन:जन्म झाला....!!!*
एकदा एक 60 - 65 वर्ष वयाच्या आजी त्यांना हार्पीस झोस्टर...छाती वर खुप मोठा व्रण...
दाह, ,दमलागणे, इत्यादि लक्षण... 3-4 दिवसांपासून थोड़े temp^^^होते,
दर्शन परीक्षा करताच *रक्तमोक्षण डोक्यात घुसले.. ते काही निघेना...*
मग केले...
शताधौत locally
रक्तशुद्धि
तापहारी
भूनिम्ब
दिले
रुग्णास दर1-1तासाला फोन लावून कलवायला सांगितले...
बुद्धि चा फोन थेट संध्याकाळीच आला...
*ओय...डॉक्टर काय घाबरतोस..??मी एकदम ठनठनीतआहे....*
रुग्णास 3 ऱ्या दिवशी बोलावले...
रुग्ण आला आल्या बरोबर म्हणते, मी आले खरे पन तुमची फीस देणार नाही...
खूपच तगड़ी फीस घेता तुम्ही....😉
😅🙏🏻🙏🏻🙏🏻😂
तिने दाखवले चट्टे पूर्ण सुकलेले...दाह शमन, ज्वर नाही, दमलागने ही नाही...
*त्या आजी ने बरेच रुग्ण पाठवलेत.. आणि प्रत्येकाला बजावून की डॉ. ची फीस थोड़ी जास्त आहे1पन गुण....👌👌👌*
*(रुग्णाच्या reply वरुन..🙏🏻😅😂)*
ती आजी नंतर मात्र काही आली नाही...
मग असेच,
संध्याकाळी 5 च्या दरम्यान
एक🚑🚑🚑....माझ्या दवाखान्याजवळ येवून थाम्बली...
थोड़ा वेळ छाती फुगली 🚑..आणि आयुर्वेदाकडे...😅👌🏻
नंतर मलाच वाटले हा चालक address चुकला असावा..
म्हणून मी जाग चा उठलो..आणि त्याला इशारयात सांगू लागलो...
की, भाऊ *हा आयुर्वेदीक दवाखाना आहे...*
तोच त्या गाडीमधून आजी चा मुलगा उतरला..
आणि दोघानी मिळून आजी ला आत आणले examination Table वर झोपवले...
बघतो तर बूढ़ी
*अल्प शुद्धिवर...*
*वरचा श्वासवर...*
*हॄदयाचे ठोके पन अनियमित...*
*सर्वांग शोथ...*
*हुरदयाची उत्तनवस्था..*
*सर्वांग शोथ असा की हात लावला की लगेच रक्त किवा द्रव बाहेर येईल*
*पाद गत शोथ खड्डा प्रवृत्ति(पिटिंग टाइप)*
*bp^^^*
*भृमित बड बड*
मनातल्या मनात म्हटल...
*भाऊ ही केस आपल्या घरावर गोटे आनेल...*
*हिला लगेच रवाना करा...*
बाहेर बघतो तर गाड़ी गायब....
मग काय ..
*"आलिया भोगाशी असावे सादर...!!!"*
मग कोनताही विचार न करता
लक्ष्मीसुतवातसितो योग चाटन
आणि जीभे खाली(sub lingwal) दिले...
मी नातेवाईकाना सांगितले की *केस जरा किचकट च आहे...*
*आणि पुढे काही बोलणार*
*तोच त्या आजी चा मुलगा म्हणतो , " फक्त आई च्या इच्छे खातिर इथे आणले आहे...*
*नाहीतर डॉ नी आम्हाला जरा जास्तच सीरियस सांगून टाकले*
*हे पहा न रिपोर्ट..."*
पण मला डिटेल्स कळेल का..???
हो आई ला अचानक छातीत दुखने, श्वास ,दम लगने, मूत्र प्रवृत्ति कमी, पायावर सूज, दाबल्या वर खड्डा पडायचा,
म्हणून 💗👩👩👩⚕कड़े नेल..
त्यानी एडमिट केल
ICU मध्ये
मागील 10 -12 दिवसांपासून
रक्त लघवी तपासन्या,
*2D Echo,:- LVF*
*हृदय व्यवस्थित काम करत नाही ये असच काही तरी सांगितले डॉक्टर ने*
*TMT :- 2 की 3 मिनिट चालली..*
वेळो वेळी *ECG...*
वेगवेगळे💉💉💉 सुरु केले...
💊💊💊5 -7 प्रकारच्या..
पण *अवस्था गम्भीर होत चालली होती ...*
*10 - 12 दिवसानंतर परत..*
*2D Echo*:- यात पहिल्या पेक्षा जास्त गाम्भीर्य आहे..
*TMT* :- मशीन वर *फक्त 2.5 sec* आई चालली आणि खाली पडली...
डॉ ने सल्ला दिला
*तत्काल रुग्णास हलवा औरंगाबाद... रुग्ण अवस्था खुप गम्भीर आहे....*🚀🛫🚀
*त्या वेळी आई ला बोलता सुद्धा बरोबर येत नव्हते,*
*ती म्हणते की मला नागिन नीट केली त्या डॉक्टर कड़े घेवून चला....🙏🏻🙏🏻🙏🏻 आणि मला ही वाटले...म्हणून मग... आम्ही आपल्याकडे आलो....!!!*
आता आपणच निर्णय घ्या...???
*अशा वेळी Risk तो लेना ही पड़ेगा... क्योकि बात तो अपने इज्जत की है...!!!*
संध्याकाळी
मी सहसा पंचकर्म करत नाही...
*पन बूढ़ी साठी सगळे नियम धाब्यावर...*
रुग्नास काही ही होऊ शकते ह्या गोष्टीची शहा निशा केलि मगच...
स्टाफ ला ही थंबवून घेतले...
लगेच बुढ़ीले *निरुह बस्ती*..
काहीच मेळ नाही कुठे बस्ती दयायलो आणि कुठे निघत आहे...🙏🏻🙏🏻🙏🏻
मागील 4 दिवसांपासून मल प्रवृत्ति नव्हती...
बूढ़ी मध्ये जरा *बस्ती चा प्रभाव दिसला ...🙏🏻🙏🏻🙏🏻*
माझा जीवात जीव आला....
मग त्याच टेबल वर
*ह्रदय बस्ती,धारा,लेप,...*
*शिरोधारा....*
*नस्य*
*(इथे मी माझ्या staaf ला खरच सलाम करू इच्छीतो...🙏🏻🙏🏻🙏🏻)*
बूढ़ी जी झोपुन आली
ती थोड़ी 15 -20 पावले चालली ...
पन त्रास सुरुच....
हॄदयर्नव रस
उर्ध्वशूलहर
उर्ध्वस्वासहर
बल्य योग
सौम्य विरेचक
निद्रा योग
देवून...
म्हटल रात्रि त्रास झाल्यास कलवने....
हीच प्रक्रिया पुढे 7 दिवस....👌👌👌
7 दिवसात बूढ़ी जी 25 पाउल पन नव्हती चालू शकत
ति जवळपास 200 ते 250 पाउल चालू लागली
छाती चा भाग पण थोडी सूज कमी झाली...
मग मी म्हटल बूढ़ी वाचली...
10 दिवसानंतर
परत 7 दिवस पंचकर्म....
मग 😎😎😎✌🏻✌🏻✌🏻
सगळ्या तपासन्या आपल्या स्टाइल ने
*TMT :- बूढ़ी 10 min च्या वर चालली..*
*2D Echo :- .....👌👌👌🏻*
सकाळ ...संध्याकाळी 14 💊💊💊गोळ्या सुरु होत्या
त्या
रुगनाने मनानेच बन्द केल्या होत्या त्या आज तागायत बन्दच आहे....🙏🏻
बूढ़ी त्याच वेळी
7 km
म्हणजे
3.5 km जाने आणि 3.5 km येणे...
आणि 6 महिन्यापासुन आपल्या चालू असणाऱ्या पन बन्द ...
सगळे घरातील काम पन सुरु
आणि
हो
त्या
*TMT ज्या सरानी केल ते*
*त्याना वाटले होते की रुग्ण औरंगाबाद ला जाउन*
*आलाय...*
आणि check up साठी आला आहे...
*डॉक्टर रुग्णास विचारतात*
*की कोठे tt केली ..??*
तर
रुग्ण म्हणतो, *आपल्या जालन्यातिल आयुर्वेदिक डॉक्टर बनमेरु कड़े...*
लगेच सर चा फोन आला...
*"मान गए प्रवीण तुझको....."*
*तूने मेरे साले का भी tt किया था आजसे 5 -6 साल पहले वह(Spine Sergon है वह) आज भी तेरा नाम लेता है ...*
*और क्या ट्रीटमेंट दी बुढ़िया को ,*
*सर आप pt को ही पूछ लीजिये...!!*
सर :-
*हम ने तो उम्मीद ही छोड़ दी थी* *इस pt की...*
*और आयुर्वेद में यह भी ट्रीट होता है...*
*और वह भी बिना एडमिट किये...*
😎🙊😎 *इथे आयुर्वेद सर्वाना नतमस्तक व्हायला भाग पाड़ते....*👌👌👌
🙏🏻🙏🏻🙏🏻
*आज बुढ़ीले 5 -6 वर्ष झाले बूढ़ी एकदम...*
*कड़यांग आहे...*
ह्या पूर्ण केस मध्ये मला
*आदरणीय गुरुवर्य वैदय प्रवीण जोशी सर, धुळे* आणि *वैदय पंकज पवार सर,यवतमाळ*
यांचे खुप मोलाचे मार्ग दर्शन मिळाले आहे ....
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
*आता मात्र गर्वानुभूति होते*ती ही
*आयुर्वेदा मुळे च....*
आणि सर्वात महत्वाचे त्या रुग्नचे आणि त्यांच्या मुलाचे खूप खूप खुप आभार ...
त्यांनी अशा condition मध्ये आपल्याकडे यायचा निर्णय घेतला...
🙏🏻🙏🏻🙏🏻
*आपलाच ,*
*वैदय प्रवीण क.बनमेरु,*
*जालना*
[10/27, 10:18 AM] Dr Nimbalkar Manoj: 5 दिवसापुर्वी आलेली एक स्त्री रुग्णा. मानेपासुन पोटापर्यंत लालसर रंगाचा भलामोठा Rash आणि त्या Rash च्या ठिकाणी किंचीत दाह ही मुख्य तक्रार. कंडु हे लक्षण विशेष नव्हते अन् कफाचे विशेष हेतु सापडले नाहीत. So शीतपित्त was ruled out.
Rash चे स्वरुप, लक्षणे आणि नाडीवरुन मुख्य Culprit पित्त आहे हे तर लक्षात आले. परंतु अम्ल धर्माने हे पित्त उसळलय की क्षार धर्माने खवळलय, हे काही मला Pin Point करता येत नव्हते. हेतुंमधे आपला भर मुख्यत: आहारावर असतो. या रुग्णेच्या बाबतीत आहारीय हेतुमध्ये नेमके दोन्हीधर्मी (अम्ल व क्षार) पदार्थ खाण्यात आले होते. So, त्यावरुन मला नेमका विनीश्चय करता येईना.
Actually,
अम्ल की क्षार या विनिश्चयासाठी सुंठ देवुन बघता येते. सुंठ सेवनाने लक्षणे वाढल्यास क्षारधर्म अन् लक्षणे कमी झाल्यास अम्लधर्म वाढलाय असे निदान करता येते. परंतु त्यासाठी रुग्णास परीक्षणार्थ 1-2 दिवसात परत बोलवावे लागते. या रुग्णेच्या बाबतीत हे शक्य नव्हते.
आहारातुन काही गवसले नाही मग म्हटले, विहारात काही मिळतय का पाहुया. मग त्या अनुषंगाने प्रश्न विचारताना नुकत्याच झालेल्या प्रवासाची आणि तिथे उन्हात फिरल्याची माहिती मिळाली. क्षारधर्माकडे लगेच मन झुकले. पण पूर्ण खात्री नव्हती झाली. मग सहज म्हणुन स्नानाबद्दल विचारले की, ''आंघोळ गरम पाण्याने केल्यास Rash वाढला का?'' यावर रुग्णेने सांगितले की,''हो! काल कडकडीत गरम पाण्याने आंघोळ केली तर लालपणा एकदम वाढला आणि आग पण झाली.''
Gotcha! Confusion Cleared!!
क्षारधर्मावर शिक्कामोर्तब करुन वळलो चिकित्सेकडे. निदान नक्की झाल्यामुळे पुढे सोप्पे झाले काम एकदम. चिकित्सा म्हणुन फक्त,
*रजनी योग + आमलकीरसायन प्रत्येकी 1 गोळी 3 वेळा (10 - 2 - 10 वाजता) पाण्यासोबत* घेण्यास दिली. त्यासोबत सुयोग्य पथ्य सांगितले.
दाह दुस-याच दिवशी थांबला आणि भलामोठा Rash देखील कमी होत जावुन, पाचव्याच दिवशी पुर्णपणे गेला आणि रुग्णा एकदम Fine!
So,
I always used to say that हेतु is of utmost importance!
*“अचुकपणे सापडलेला हेतु,*
*जणु चिकित्सेकडे नेणारा सेतु!”*
*जय आयुर्वेद!!*
- वैद्य मंदार दिलीप गद्रे, पनवेल.
डॉक्टरांना समजून घेवू या ४
*डॉक्टर लोक डिपॉझिट का भरून घेत असतील..?*
- डॉ सचिन लांडगे.
आपल्या देशात आरोग्यासाठी पैसे बाजूला काढून ठेवण्याची पद्धतच नाही.. जेणेकरून कधीही लागल्यास लगेच ATM मधून काढता येतील.. मग विमा (मेडिक्लेम) असणं तर दूरची गोष्ट आहे.. अचानक काही उद्भवलं की लगेच पळापळ सुरू होते..
बरं.. स्वतःचं क्रेडिट तर असं की, जवळचे नातेवाईक पण पैशाची मदत करायला टाळतात.. मग डॉक्टरांकडूनच अपेक्षा केली जाते की त्यांनी डिपॉझिट न घेता उपचार चालू ठेवावेत.. माणुसकी काही आहे की नाही डॉक्टरला.!!
तुमच्यावर वेळ आली आहे म्हणून डॉक्टरांनी ती समजून घ्यावी अशी अपेक्षा केली जाते.. पण डॉक्टरांसाठी तर हे रोजचेच असते.. त्यांना अनेक नमुन्यांची माणसे रोजच भेटत असतात.. अनेक प्रकारचे अनुभव आलेले असतात.. आणि तुमच्यावरची धोक्याची वेळ निघून गेल्यावर तुम्ही तुमची नियत बदलणार नाही कशावरून?? पैसे बुडवणार नाही कशावरून? किंवा कमी भरणार नाही कशावरून? आणि बिल बुडवून गेलेला पेशंट काही पुन्हा त्या डॉक्टरकडे येत नाही.. म्हणजे पेशंटही तुटला आणि पैसेही गेले..
लोकांची पैसे बुडवाबुडवीची वृत्ती वाढली म्हणून तर डॉक्टरांची डिपॉझिट भरून घ्यायची पद्धत सुरू झाली.. नाहीतर पूर्वी असं नव्हतं.. डॉक्टरांचा लोकांवर विश्वास असायचा.. आता विश्वास ठेवावा अशी परिस्थिती राहिली नाहीये..
बिल भरायच्या वेळी लोक सरपंच नगरसेवकापासून ते आमदार किंवा गुंडांपर्यंत कोणाचेही फोन घेऊन येतात.. निर्लज्जपणा आहे हा.. पेशंटसाठी ही क्वचित वेळ असेल तरी डॉक्टरांसाठी मात्र हे रोजच घडतंय.. मग डॉक्टरांनी आधीच काही पैसे भरून घेतले तर चूक काय आहे त्यात.? *कोणाची नियत बदलणार नाही आणि कोणाची बदलेल हे डॉक्टरने कसे ओळखायचे..??*
आणि पैशाचा प्रश्न असला की लोक बापाला भावाला पण धोका देतात, मग डॉक्टर काय चीज आहे.? आणि डॉक्टरनं का म्हणून लोकांना फुकटात सेवा द्यायची? तुमच्या उपचारासाठी लागणारी कोणती गोष्ट डॉक्टरला फुकट मिळते म्हणून त्यांनी तुम्हाला फुकट उपचार द्यावेत? माफ करा, तुम्हाला हे लिहिलेलं उद्धट वाटेल, पण वस्तुस्थिती अशीच आहे.. तुमच्याकडे पैसे नसताना दुसरं कोणतं क्षेत्र तुम्हाला एंटरटेन करतं सांगा??
कोर्ट पण मोठया ऐटीत व्हर्डीक्ट देतं की, "पैशांच्या कारणास्तव रुग्णालये पेशंटचा डिस्चार्ज किंवा बॉडी ताब्यात देणं रोखू शकत नाहीत".. छान.. मग वसुली कशी करायची ते पण सांगा..! आपला कामधंदा सोडून डॉक्टरांनी वसुलीच्या पाठीमागे लागावे का?
*सध्या डॉक्टरांकडून बिलं कमी करून देणे किंवा पैसे उकळवून देणे (Extortion), हा कित्येक गुंडांचा आणि राजकीय पुढाऱ्यांचा साईड बिझनेसच झाला आहे..* प्रत्येक गल्लीत एक सेटलमेंट करणारा दादा असतो.. आणि डॉक्टर हे समाजाचे सॉफ्ट टार्गेट आहे.. आपलं खरं असलं तरी, पेपरबाजी आणि बदनामीला घाबरतात डॉक्टर.. कारण कुठल्याही कुटाण्यासाठी डॉक्टरकडे 'वेळ' नसतो आणि 'इच्छा'ही नसते म्हणून डॉक्टर प्रत्येक ठिकाणी कॉम्प्रमाईज करतात, किंवा "जाऊ दे" म्हणून सोडून देतात.. आणि याचाच गैरफायदा हे गुंड उचलतात..
प्रत्येक डॉक्टर नेहमी अशा प्रकाराला सामोरं जातच असतात.. पण याउलट कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये असतं.. तिथं वरचे दोन रुपये पण सोडत नाही हॉस्पिटलचे मॅनेजमेंट.!! त्यांची वसुली सिस्टीम समर्थ असते.. वकील दिमतीला असतात.. लुटले गेले तरी तिथं नाही आवाज करता येत लोकांना.. मग त्याचा राग इकडे छोट्या हॉस्पिटल्सवर काढत बसतात.. कॉर्पोरेट हॉस्पिटल्स ही मोठ्या उद्योग समूहांची असतात, तिथं डॉक्टर्स नोकरीवर असतात, तिथलं बिलिंग डॉक्टरच्या हातात नसते हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं.. असो..
मूळ मुद्दा काय आहे, समजा ऍक्सिडेंट झालाय किंवा इतर इमर्जन्सी आहे आणि नातेवाईक जमा होईपर्यंत किंवा पैसे जमा होईपर्यंत उपचार थांबायला नको हे कोणीही मान्य करेल.. *आणि कोणताही डॉक्टर अशावेळी इमर्जन्सी उपचार टाळत किंवा थांबवत वगैरे नाहीत..* असं फक्त टुकार आणि गल्लाभरू पिक्चरमध्येच दाखवत असतात.. "पेशंट अगर मर रहा हो तो भी पहले फ़ॉर्म भरो, या पैसे भरो फिर तुम्हारे पेशंट को हम देखते हैं" असं अजिबात अजिबात नसतं.. डॉक्टरसोबत कॅज्युअल्टीत एक दिवस घालवून पहा मग कळेल.. ह्या पिक्चरनी तर डॉक्टरांची इमेज खूपच भडक दाखविली आहे.. मेडिकल सायन्स विषयी असलेल्या अतिअज्ञानाचा कळस म्हणजे भारतीय चित्रपट!!
असो..
पण अशा प्रकारच्या अति इमर्जन्सी केसेस किती असतात..? 99 टक्के वेळा तर असं नसतं ना..! मग लोक गाफील का राहतात..? अशा प्रकारच्या इमर्जन्सीसाठी पैसे ठेवायला लोकांनी शिकायला हवं ना..! दवाखान्यात जाताना डिपॉझिटसाठी पैसे घेऊन जावे किंवा डेबिट कार्ड सोबत न्यावे, हे प्रत्येकाला कळायला हवं.. *डॉक्टरांनीच कुठवर समाजावर एकतर्फी विश्वास ठेवावा.. समाजाने पण बदलत्या काळाची परिमाणे अंगीकारली तर बरं होईल..*
डिपॉझिट किंवा ऍडव्हान्स म्हणून एक किंवा दोन दिवसांच्या उपचाराचेच पैसे भरून घेतले जातात, किंवा ऑपरेशन असेल तर खर्चाच्या ठराविक टक्के रक्कम भरून घेतली जाते.. पूर्ण बिल आधीच भरून कोणी घेत नाही.. वेळोवेळी बिलाची पूर्वकल्पना देऊन पण शेवटी नातेवाईक तोंडं वाकडी करतातच.. लग्नाच्या बस्त्यासाठी पैसे असतात, मल्टिप्लेक्स साठी पैसे असतात, बर्थडे पार्टी किंवा डिनर साठी पैसे असतात.. पण आरोग्यासाठी मात्र उदासीनता असते.. याचं कारण लोकांनी प्रॉपर प्लॅनिंगच केलेलं नसतं कधी.. *आपल्या इन्कमचा ठराविक हिस्सा आरोग्याच्या तरतुदीसाठी वेगळा शिल्लक ठेवायचा असतो, किंवा आरोग्याचा वेगळा विमा असतो.. तो काढायचा असतो, हे बहुतांश जणांच्या गावीही नसते..*
बऱ्याच सुशिक्षितांना पण मेडिक्लेमचे हप्ते भरणं म्हणजे पैसे वाया घालवणं असंच वाटतं..! सांगितलेल्या रक्ताच्या टेस्टस नॉर्मल आल्या की खुश होण्याऐवजी पैसे वाया गेल्याचे वाईट वाटणारा भारत हा एकमेव देश असावा!!
पाश्चात्य देशात प्रत्येकजण इन्श्युअर्ड असतो.. प्रत्येकाचा आरोग्यविमा असतो.. आरोग्याच्या बाबतीत प्रत्येकजण जागरूक असतो.. आणि आपण बसलोय इकडं डॉक्टरने डिपॉझिट घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे यावर वाद घालत..
*कुठलीही वस्तू किंवा सेवा फुकट मिळत नाही, तर त्यासाठी मोबदला द्यावा लागतो, म्हणून खाजगी वैद्यकीय सेवा देखील फुकट मिळणार नाही हे समाजाला अजून पटतच नाहीये..* वैद्यक व्यवसाय हा अर्थव्यवस्थेच्या 'सेवा क्षेत्रातील' एक 'व्यवसाय'आहे. *कायद्याच्या आणि सरकारच्या दृष्टीने तो व्यवसायच आहे, पण समाज अजूनही "सेवा" शब्दाचा स्वतःच्या सोयीचा अर्थ काढून गैरसमजात आहे..* समाज डॉक्टरांना व्यावसायिक म्हणून जितक्या लवकर स्वीकारेल तितकं दोघांसाठीही चांगलं आहे..
- डॉ सचिन लांडगे. भुलतज्ञ, अहमदनगर.
**