Wednesday, 15 November 2017
नि:संशय ! नि:श्रेयस !!
नि:श्रेयस !!!
लहानपणापासून 'मी कुणीतरी आहे' हे मूल शिकले तर त्याला 'समजायला' लागलं असं म्हणतात.
परंतु 'मी पण' विवेकानं सुटलं कि त्याला 'उमजायला' लागलं म्हणतात.
'मी पणा'नंतर येत 'माझे'पण. मग ते मिळणं किंवा मिळवणं... 'लाभ'.
'लाभ' नंतर मग तो शुभ कि अशुभ.
तात्कालीक का दूरच्या फायद्याचा.
म्हणून घरापुढे किंवा पुजेत शुभ~लाभ लिहीणेची आठवण राखणे, करुन देण्याची प्रथा!!
पुढे येतं श्रेय~अपश्रेय.
चांगला मी किंवा मीपणा चा लाभ मिळाला कि त्याचं श्रेय आपलं म्हणतो; आणि अलाभ म्हणजे न मिळणं किंवा सुटणं झालं तर.......... विवेक विकसीत होत असेल तर..... अपश्रेयसुध्दा (म्हणजे अलाभाचं श्रेयसुध्दा) आपल्यावरच ओढून घेतलं जाऊ शकतं.
पण उमजण्यापुढे आपण मुलांना नि:श्रेयसत्व शिकवत असतो; हे आपण विसरतो का?
विवेकाला जर योग्य निष्ठा/धारणा/आधार नसेल तर हे शक्य !!
काय शिकवतो आपण मुलांना नि:श्रेयस सांगताना !!
यश~अपयश, लाभ~हानी, प्राप्त~अप्राप्त ईश्वर कृपेने !!
म्हणजेच
शुभ आणि लाभ च्या मध्ये जे ।।श्री।। किवा ।।ओम।। ते म्हणजे हे ईश्वर रुपी भले कृत्रिम का असेना एक अस्तित्व !!
कि जिथून मुलाचे 'मी पण' सुरु होते.
असा त्याचा निसर्गाकडून निसर्गाकडेचा प्रवास शिकवताना आपण अलिप्त होतो त्याला विवेक देण्याचा प्रयत्न करून.
पण निष्ठारुप आपण उरावं लागतं ना !!! कारण त्याला नि:श्रेयसाचं पालन कसं करायचं याचं उदाहरण घालून देण्यासाठी, अडथळे येतातच.. त्यावर मात कशी करायची ते दाखवण्यासाठी आणि त्यालाही दुसर्यासाठी उदाहरण म्हणून उभं राहण्याची पात्रता कशी प्राप्त करायची हे सप्रयोग दाखवण्यासाठी.
प्रवास ईथे संपत नाही.. ना त्या मुलाचा ना आपला !!
हि सुरवात असते मानवतेची !! हे मुळ मनुष्यत्व म्हणजे पशुत्वातून आपली उत्क्रांतीनंतरची पहीली पायरी.
अजुन पुढे खुप प्रवास असतो ... आनंद~दायक !!!
तुर्त
नि:श्रेयस म्हणजे लाभाचे कारण मी नाही म्हणावं तसेच अलाभाचे अपश्रेयही आपले नाही हे जाणावं !! तर पुढचा प्रवास
लाभा$लाभो धनंजय: ।
समजेल !
अजून नाही कळलं का?
येवढं बोर का करतोय !
थोडक्यात..
मी 'नापास' झालोय !
आणि 'पास' ही !
बरोबर ???
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment