[11/16, 5:03 PM] +91 75881 55361: *विसर्गोदानविक्षेपै:सोमसुर्यानिला यथा।*
*धारयन्ती जगातद्येहं कफपित्तानिलास्तथा*। - सु. सु. २१/८
👉🏻ज्या प्रमाणे चंद्र, सूर्य आणि वायू आपल्या विसर्ग, आदान, विक्षेप या कार्याद्वारे संसाराचे धारण करतात त्याच प्रमाणे वात, पित्त, कफ देखील या देहाचे धारण करतात.
*विकृताSविकृता देहं घ्रन्ति ते वर्तयन्ति च।*
- अ.सं सु. १/२१
👉🏻दोष जेव्हा विकृत असतात तेंव्हा शरीराचा नाश करतात परंतु हेच दोष जेंव्हा अविकृत(साम्यावस्थेत) असतात तेंव्हा ते शरीराचे धारण करतात व आयुष्याचे संरक्षण करतात.
*वायु:पित्तं कफो दोषा धातवश्च मलस्तथा ।।*
- शा. पु.५/४१
👉🏻शारंगधरांनी तर दोषांना *धातु* ही संज्ञा बहाल करून देहधारणात त्यांचा अतीशय महत्वाचा वाटा विशद केलाय.
.
.
.
.
.
.
.
परंतु आयुष्याला अपकारक व उपकारक असे हे त्रिदोष अथवा त्रिदेव अनेकानेक कारणांनी आपली अवस्था सतत बदलत असतात.
*रोगस्तू दोषवैषम्यं दोषसाम्यरोगता।*
- अ.सं.सु१
👉🏻या देहाचे धारण करणाऱ्या, व्याधी उत्पत्तीमधे अतिशय महत्वाची भूमिका बजावणाऱ्या तसेच यांच्या साम्यतेकडे व्याधीप्रतिबंधात्मक म्हणूनही आपण बघू शकतो असे हे त्रिदोष, धातु अथवा मल.
आणि
त्यातही महादेव म्हणजे *वात*🙆🏻♂, 'ज्यांचे' प्राधान्य वर्णन करतांनाचा
*पित्तं पंगू कफं पंगू……….।।* हा श्लोक, -च.सु.१२, - सु.नि.१ हे आपणा सर्वांना ज्ञात आहेच.
खरोखरच *त्रिदोष साम्यता* ही एनकेनप्रकारे परंतु प्राधान्यानेच सांभाळण्याजोगी बाब! 🙏🏻
[11/17, 8:02 AM] +91 75888 76222: *आशयापकर्षगती*
जरा ऐकायला भयंकरच!!
ग्रुप वर एक student ,आता आमची छोटी ताई,तिने टाकलेली ही गुगली!
असो घेतला वसा टाकू नये, असे म्हणतात तेच खरे!
अगदी खरे सांगतो, माधव निदान काढावे लागले!!
तर मूळ मुद्दा!
ही जरा वेगळीच गती आहे हे मात्र खरं!
या गतीचा कोष्ठ शाखा किंवा शाखा कोष्ठ असा प्राकृत
प्रवास नक्कीच नसतो।
वायू चा सहभाग मात्र अगदी आवर्जून असतो।
कारखानदार बनायला हवं पुन्हा!!
सकाळच्या शिफ्ट मधील कफ कामगार संख्येने कमी ( एखाद्या ठिकाणी चा कफक्षय) झाले तर तिथे कफक्षयची (म्हणजे कामगारांची उणीव) लक्षणे दिसून येतात।
आता ही तर साधी संप्राप्ती झाली, हो ना!
मग नवीन काय यात?
इथे वाहतूक करणारा वात शांत बसेल तर शप्पथ।
बरोबर डोकं लावून ही ड्राइवर मंडळी दुपारच्या पित्त मंडळी ची काही लोकं सकाळच्या ड्युटी मध्ये त्या कामाची झीज भरून काढण्यासाठी घेऊन जातात।
उपयोग होत तर नाहीच पण जिथे कफ क्षयाची लक्षणे दिसत होती तिथे पित्ताची लक्षण दिसू लागतात।
गंमत सांगतो।
कोरड्या खोकल्यावर ब्रांडी पिल्यावर पिवळा कफ पडतो हा अनुभव घेतलाय?
वातज कास-----म्हणजे कफक्षयच--------साधे लसूण सिद्ध तीळ तेल ड्रॉप method ने घेतलं तर आराम नक्की पडणार असा विचार!
पण हुशार मंडळी ब्रांडी प्यायचे निमित्त शोधतात आणि इथेच गच्चा होतो।
स्रोतो विवृत्त्व होते आणि खोड्या काढण्याची वाट पाहत असलेला वात आमाशयातील पित्ताला शाखगत करतो आणि हे विकृत पित्त फुफ्फुस च्या ठिकाणी जमा व्हायला सुरू होते आणि खोकल्यातून पिवळा कफ पडायला सुरुवात होते।
वाताने केलेल्या या खोडसाळ पणाला आशयापकर्ष गती म्हणतात।
थोडक्यात osmosis या physics च्या प्रोसेस प्रमाणे।
कोरडे बनियन पाण्यात थोडे भिजवून उभे धरा।
पाणी वर चढायला लागते।
अगदी तसा विचार!!!!
धन्यवाद!
-----------------------------
*वैद्य भरत कुमार प्र जाधव*
*फोन-9552361074*
No comments:
Post a Comment