सद्यफल चिकित्सेचा एक अनुभव share करतोय.
पाली येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थान आणि आयुर्वेद व्यासपीठ, रायगड संचालित साप्ताहिक आयुर्वेदिक सेवा दवाखान्यात एक सुमारे 45 वर्षे वयाची स्त्री रुग्णा आली होती.
मुख्य तक्रार एकच- *डाव्या हाताची करंगळी कोणतीही हालचाल झाल्यावर दुखते.*
सुमारे 2 महिन्यांपासुन हा त्रास होता.
बरेच अौषधोपचार केलेले होते परंतु त्रास अजिबातच कमी झाला नाही. Analgesics घेवुन झाले पण वेदना थोडीही कमी होत नव्हती.
मी रुग्णेच्या दोन्ही हातांच्या करंगळ्या प्रत्यक्ष स्पर्शाने तपासल्या. आधी वेदना नसलेली आणि मग वेदनायुक्त. दुखरी करंगळी हलवुन पाहिली. Laterally -Medially आणी Fold-Unfold अशा चारही हालचाली करुन पाहिल्या. प्रत्येक हालचाल सशूलच होती.
दोन्ही करंगळ्यांचे नीट निरीक्षण केल्यावर एक गोष्ट जाणवली की, दुखणा-या करंगळीचे दोन्ही पर्वसंधी किंचीत फुगीर होते पण ती सुज नव्हती. मनात एक विचार आला की नलकास्थि जसे सांध्यातुन किंचीत सरकले तरी वेदना होत रहाते तसे काही झाले असेल का?
या विचारानुसार प्रथम त्या करंगळीच्या तळहाताकडील पर्वसंधीवर किंचीत दाब देवुन पाहिले. माझ्या बोटांना अत्यल्प Movement जाणवली. मग जरा जास्त जोरात दाब दिला तर माझ्या बोटाला परत किंचीत Movement आणि यावेळी कट् असा आवाज पण जाणवला. रुग्णेस काहीच जाणवले नाही. यानंतर करंगळीच्या हालचाली करायला सांगितल्या तर नखाकडील संधीस्थानी दुखले पण ज्या तळहाताकडील पर्वसंधीला दाब दिला तिथे अजिबात दुखले नाही. ''Whoaaa!! सापडली विकृती!'' असे झाले मला.
मग काय... नखाकडील पर्वसंधी पण तशाच पद्धतीने दाब दिल्यावर तेथेही किंचीत Movement आणि कट् आवाज जाणवला. करंगळीची हालचाल करायला सांगितली तर आता दोन्ही संधीस्थानी अजिबातच दुखले नाही. करंगळी हलवताना कळवळणारी रुग्णा एकदम हसली आणि लहान मुलासारखे आनंदाने ओरडली, ''काय जादु केलीत डाॅक्टर, आता अजिबात दुखत नाहीये!''
मी ''युरेका!'' असे मनातल्या मनात ओरडलो आणि काय झाले ते सोप्या शब्दात रुग्णेस explain केले. आणि त्या करंगळीच्या ठिकाणी झालेला स्थानसंश्रय दूर व्हावा यासाठी रोज 2 वेळा तिथे नारायण तेल लावण्यास सांगितले. रुग्णेने सांगितल्यानुसार, अात्तापर्यंत तिने घेतलेल्या Treatments तिला देण्यापुर्वी, प्रत्यक्ष करंगळीला स्पर्श करुन कोणी तपासलेच नव्हते. दर्शन आणि प्रश्न परीक्षेसोबत स्पर्शन परीक्षण पण महत्वाचे ठरते हे या अनुभवातून शिकायला मिळाले मला.
याशिवाय रुग्णेची वेदना ताबडतोब कमी नव्हे तर बंद करु शकल्याचा आनंद फार मोठा होता.
We Practitioners live for the moments like these, isn't it?
- वैद्य मंदार दिलीप गद्रे
No comments:
Post a Comment