Wednesday, 23 August 2017

वाहनसुरक्षा व भ्रम

*टोयोटा फॉर्च्युनरचे सेफ्टी फीचर्स संजय चौपानेंच्या कामी का नाही आले?*
https://www.ejanshakti.com
● औरंगाबादमधील कालच्या ज्या अपघातात काँग्रेस सचिव संजय चौपाने यांचा मृत्यू झालाय, त्या अपघाताची छायाचित्रे भीषण आहेत. पण एक प्रश्न राहून-राहून मनात येतोय की, ग्लोबल NCPAने टोयोटा फॉर्च्युनरला दिलेल्या 5 स्टार सेफ्टी रेटिंग्सच्याही या अपघातात चिंधड्या नाही का उडाल्या? राजकारण्यांची ही आवडती गाडी आहे ती सेफ्टी फीचर्समुळेच! टोयोटाचा आजवर दावा होता की, अगदी हारशेस्ट स्थितीतही टोरझोनल आणि बेंडिंग रिजिडीटी प्रवाशांना सुरक्षित राखेल. एडव्हान्सड डेम्पिंग टेक्नॉलॉजीचा दावाही फुसका ठरला. HAC, DAC, A-TRC सगळ्यांचीच पोल खुलली. SRS फ्रंट ड्युएल एअरबॅग्सवर ही गाडी सुरक्षित आणि भरवशाची नाही. पुढून धक्का लागला असता बोनेटला तर हे सेफ्टी फीचर्स एकटीव्हेट झाले असते कदाचित. मागून धक्क्यामुळे 26 लाखांहून अधिकच्या किंमतीची ही गाडी प्रवाशांचा जीव वाचवायला कुचकामी ठरली. कदाचित 29 लाखांची फोर्ड एंडेव्हर किंवा मित्सुबीशी प्याजीरो असती तर चित्र इतके भीषण दिसले नसते. 25 लाखांच्याच इसुझु MUX नेही नक्कीच काहीतरी अधिक सुरक्षा प्रदान केली असती. कदाचित टोयोटाच्याच 21 लाखातल्या इनोव्हा क्रीस्टाच्या 7 एअरबॅग्जही या दुर्घटनेत मदतीला आल्या असत्या.
https://www.ejanshakti.com
*तात्पर्य, केवळ प्रतिष्ठा म्हणून नको तर सेफ्टी फीचर्स पाहून गाडीची निवड व्हायला हवी. पत असणाऱ्यानी तर लँड रोव्हर डिस्कव्हरी किंवा नवी लँड रोव्हर रेंज ओव्हरच घ्यावी!*
https://www.ejanshakti.com
● प्रसाद लाड यांनी मर्सिडीजविरोधात दिलेला लढा यानिमित्ताने आठवतो. त्यांच्या मुलाची मर्सिडीज डिव्हाईडरला धडकली होती, मात्र एअरबॅग्ज ओपनच झाल्या नाहीत. त्याविरोधात त्यांनी हा लढा दिला होता. त्यावेळी मर्सिडीजने दावा केला होता, की धक्का विशिष्ट वेगात आणि विशिष्ट तीव्रतेचा असेल तरच हे सेफ्टी फीचर्स कामाला येतात.
https://www.ejanshakti.com
● एकूणच भारतात प्रवाशांच्या सुरक्षेचे निकष ढिले आहेत. हेच कारमेकर्स अमेरिका, युरोपात उच्च दर्जाचे सेफ्टी फीचर्स देतात. भारतात जर ग्लोबल NCPA 5 स्टार सेफ्टी रेटिंग्सवाल्या टोयोटा फॉर्च्युनर या SUVची ही अवस्था असेल तर इतर हॅचबॅक व सेडानमधून शब्दशः जीव मुठीत धरूनच प्रवास करण्यासारखं आहे.
*- विक्रांत पाटील, जनशक्ति*
https://www.ejanshakti.com

No comments:

Post a Comment