एक विडंबन ......
श्रावणमासी खेद मानसी
हिरवळ गेली कुणीकडे?
शहरें भरली इमारतींनी
डांबर फरश्या चहुकडे।।
मनु बदलला अणु फोडला
निसर्गातही बदल घडे
श्रावणमासी तो मौजेचा
पाऊस आता कुठे पडे ? ।।
राने तुटली, कुरणे हटली
उजाड हे डोंगरमाथे
सुंदर हरणी हिरव्या कुरणी
कुठे कशी मग बागडते ? ।।
सुवर्ण चंपक अजुनी फुलतो
रम्य केवडा दरवळतो
नगरनिवासीजन हौसेस्तव
बाजारी विकला जातो ।।
थकून भागून घरी परतती
ललना सायंसमयाला
हर्ष न उरतो ह्रदयी त्यांच्या
देवदर्शना निघण्याला ।
प्रदुषणाने जीवन अवघे
होऊनी गेले संत्रस्त
कुठे कुणाच्या वदनी वाचू
श्रावण महिन्याचे हे गीत ।।
No comments:
Post a Comment