Saturday, 2 September 2017

म्हंजे आयुर्वेद नव्हे

*....म्हणजे आयुर्वेद नव्हे...!*

कडकनाथ कोंबडी अन आयुर्वेद यांचा कुठला ही संबंध नाही।।

फेस होणारी टूथपेस्ट - साबण - शाम्पू अन आयुर्वेद यांचा कुठला ही संबंध नाही।।

चहा आणि कॉफी ही आयुर्वेदानुसार एक प्रकारचे विष आहे।।। त्यामुळें आयुर्वेदिक चहा व कॉफी असं काहीही नसतं ।।।

आयुर्वेदात कुठलं ही बिस्कीट वर्णलेल नाही।। किंवा कुठल्या प्रकारचा देशी आटा आयुर्वेदिक नाही।।

कोलेस्टेरॉल वाढवणारे यंत्रावर बनविलेले घी किंवा Buttar हे नक्कीच आयुर्वेदिक घृत/तूप नाही..! हे पक्के ध्यानात ठेवा।।

आणि बाजारातील Butter हे कधीच कोलेस्टेरॉल Free असू शकत नाही, हे ही पक्के ध्यानात ठेवा।।

स्वदेशी म्हणून खरेदी करू शकता, पण आयुर्वेदिक म्हणून खरेदी करू नका।।

"भरपूर हिरव्या पालेभाज्या खा।।" असं आयुर्वेदात कुठं ही सांगितलं नाही।।

किंवा रोज एक सफरचंद खायला..! आयुर्वेद सांगत नाही।।

आयुर्वेद भूक लागली की खायला सांगतो।।
वेग आले की जायला सांगतो।।

आयुर्वेद भूक सांभाळून खायला सांगतो।।

मात्र क्रोध - ईर्ष्या - लोभ- मत्सर आदी मानसिक वेग आडवायला सांगतो।।।

"पाणी पचवायला ही पचनशक्ति लागते" हे सांगनारा आयुर्वेद तहान लागल्यावर पाणी प्यायला सांगतो।।

दररोज 5 -7 lit पाणी पिऊन मोरी धुतल्या प्रमाणे किडन्या धुणे आयुर्वेदात नाही।।।

मध गरम पाण्यात टाकुन खाणे, ही आयुर्वेदात नाही।।।

किंवा काही आजार नसताना दररोज "एक प्याला गोमूत्राचा...!"पिणं ही आमच्या आयुर्वेदात नाही।।

निसर्गोपचार म्हणजे आयुर्वेद नाही।।
किंवा Allopathy निदानावर हर्बल औषधी म्हणजे आयुर्वेद नव्हे।।।

कोणी भोंदू वैद्याने किंवा तंबूवाल्या वैद्याने दिलेली औषधी म्हणजे आयुर्वेद नव्हे।।।

7 दिवसात पाच पंचकर्म म्हणजे आयुर्वेद नव्हे।।

किंवा स्पा मसाज म्हणजे आयुर्वेद नव्हे।।

हे सारे आयुर्वेदाच्या नावे "मार्केटिंग फंडे" हे मेरे यार।।।।।

जिथं जमल तिथं *आयुर्वेदिक* नाव टाकलं की झालं....!

सांगणं एवढंच आहे,
खरा आयुर्वेद जाणून घ्या।।।

No comments:

Post a Comment